Search


अज्ञात आहे पण ही पोकळी नाही
सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पिळोखे देत अजूनही अंथरुणात बसली असेल. केस आवरत लॅपटॉप ऑन करत असेल. एखादा नीटनेटका आवरून बसला असेल आणि विडिओ ऑन करू का बंदच ठेऊ असा विचार करतच वर्ग जॉईन करत असेल. लॅपटॉपवर उघड्या असलेल्या विंडोज बंद करतो. समोर स्क्रीनकडे एकदा पाहतो. मग, बाजूच्या गच्चीतून समोर निरभ्र आकाशाकडे पाहतो. समोरचे आंब्याचे झाड हलकेसे झोके घेतेय. बाजूचा आ
Ashutosh Potdar
Apr 15, 2021


नाटकवेळा (अतुल पेठेसाठी)
१. घंटेपूर्वीची घंटा प्रकाशाशिवाय प्रकाशमान करू शकतोस – तू हे हिरवे दिवे. हाकारत राहतात तुझे डोळे. उसवलेली रात्र. सूर्याच्या खांद्याला खांदा लावून. विरामाची सुरुवात. २. आदि सजवावा लागत नाही अवकाश. पावलानीशी रेखत जातो वामन. भारावलेली मने ठिबकत जातात आपल्या जागा. दिपून जातो शेजार. रांगोळीचा प्रदेश. ३. स्तब्धता पर्वताच्या पायथ्याशी बसून राहतो शब्द. समुद्र रेंगाळत राहतो हालचालींशी. ओवतोस तू पर्वत आणि समुद्र. वर्तमानाच्या कुशीत अतीत. मोगरमाळ. ४. कॅरॅक्टर्स बोलावतोस बेकेट. कधी नर
Ashutosh Potdar
Mar 27, 2021
दोन कविता
एक वेळ उन्हाळ वेळेला शर्यत लावत असतात तुमच्या सावल्या तुमच्याबरोबर आणि वाट पहात असता विसाव्याची. पिळून टाकायचा असतो माथ्यावरचा सूर्य झाडुन टाकायची रखरख. आणि लटकवुन द्यायचाय त्याला डेरेदार आंब्याच्या झाडावर. शिंपडता पाणी तुह्मी रखरखत्या आभाळावर येणार असते कुणी चार एक वाळवंटं ओलांडून पाच सहा समूद्र लांघून वाट पहात असता शिडाची. गच्च भरलेला डबा उघडू पहाता नखं घालून उचकटू पहाता टोपणाची घट्ट मिठी. संभ्रमाने झाकोळलेल्या आकाशा्वर शंकेखोर जमीनीवर सडा टाकून रांगोळी रेखाटण्याची वाट पह
Ashutosh Potdar
Jan 7, 2015
